

जगाला होस्ट करा
ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक गेम्स शहरात येतात तेव्हा स्थानिक लोक जगभरातील पाहुण्यांचे स्वागत करतात. Airbnb सोबत, तुम्ही जगातील सर्वश्रेष्ठ क्रीडा स्पर्धेच्या सामूहिक उत्साहामध्ये तुमचे शहर आणि तुमचे घर शेअर करू शकता.
2028 पर्यंत ऑलिम्पिक चळवळीला सपोर्ट करण्यासाठी Airbnb आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) यांच्यातील भागीदारीबद्दल आम्ही अत्यंत आनंदी आहोत. नऊ वर्षे आणि पाच गेम्ससाठी असलेली ही भागीदारी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक गेम्समधील खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या अनुभवांना प्रोत्साहन देते. ॲथलीट्सना सपोर्ट

Airbnb ॲथलीट प्रवास अनुदान
ॲथलीट्सनी त्यांच्या प्रशिक्षणाच्या आणि स्पर्धांच्या जवळ राहणे आवश्यक असते याची Airbnb ला जाण आहे आणि म्हणूनच आम्ही पात्र ॲथलीट्सना USD $2000 इतके मूल्य असलेले ॲथलीट प्रवास अनुदान ऑफर करत आहोत. जगातील 1,000 सर्वोत्कृष्ट ऑलिम्पियन्स आणि पॅरालिम्पियन्स Airbnb वरील निवासांसाठी हे अनुदान वापरून त्यांच्या प्रशिक्षण आणि पात्रतेच्या खर्चाच्या बाबतीत अतिरिक्त मदत मिळवू शकतात.

Airbnb500 ट्रॅव्हल फंड
ऑलिम्पियन्स आणि पॅरालिम्पियन्सचे प्रयत्न आणि त्यांच्या यशाचा सन्मान करण्यासाठी USD $500 इतके मूल्य असलेला उत्सवी प्रवास फंड ऑफर करताना आम्हाला गर्व होतो आहे. पात्र ॲथलीट्स हा फंड Airbnb च्या निवासांवर लागू करून नवीन डेस्टिनेशन्स एक्सप्लोर करू शकतात, थोडा वेळ आराम करू शकतात किंवा त्यांना हवे ते करू शकतात. Airbnb500 मिळवण्याकरता, तुम्ही Athlete365 वरील ऑफर क्लेम करण्यासाठी रजिस्टर करणे आणि पात्रतेचे विशिष्ट निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
गेम्सना सपोर्ट करणे

स्थानिकांसाठी चांगले
पुढील नऊ वर्षात पॅरिस, मिलानो - कॉर्टिना आणि लॉस एंजेलिसला भेट देणाऱ्या ॲथलीट्सना आणि त्यांच्या चाहत्यांना लाखो नवीन होस्ट्स निवासव्यवस्था आणि अस्सल स्थानिक अनुभव पुरवणार आहेत. प्रचंड संख्येत येणाऱ्या या पाहुण्यांना निवासासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर देताना Airbnb कम्युनिटीला अभिमान वाटतो आणि आमच्या भागीदारीमुळे स्थानिक होस्ट्स आणि कम्युनिटीजना थेट उत्पन्न मिळणार आहे.

ऑलिम्पिक चळवळ
एक अधिक चांगले जग निर्माण करण्यासाठी संस्कृती आणि शिक्षणासोबत खेळांचा मिलाफ करण्याच्या तत्त्वज्ञानाला म्हणजेच ऑलिम्पिज्मला प्रोत्साहन देण्याच्या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या मिशनला सपोर्ट करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. ऑलिम्पिकची भावना आमच्या होस्ट कम्युनिटीजद्वारे पुढे चालवली जाईल याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो आहे आणि आजवरचे सर्वात समावेशक, सर्वांना उपलब्ध आणि सर्वाधिक सस्टेनेबल गेम्स निर्माण करण्यात मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

तुमच्या घरी गेस्ट्सना होस्ट करा
तुमची एक छोटी रूम असो किंवा प्रशस्त घर, Airbnb स्थानिकांना गेम्सचा आनंद घेण्याची आणि अविस्मरणीय संबंध तयार करण्याची अनोखी संधी देते. होस्ट बनून, तुम्ही केवळ खेळांच्या उत्साहातच भर घालत नाही आहात तर स्थानिक कम्युनिटीला देखील समृद्ध करत आहात. साईन अप करणे सोपे आहे आणि लिस्टिंग तयार करणे मोफत आहे.