तुम्हाला जे आवडते ते करून पैसे कमवा
लाखो गेस्ट्ससाठी एक अद्वितीय Airbnb अनुभव तयार करा.
Airbnb वर तुमच्या शहराचे सर्वोत्तम पैलू समोर आणा
तुमच्यासारख्या स्थानिकांच्या नेतृत्वातील उच्च दर्जाच्या अनुभवांच्या आमच्या मार्केटप्लेसमध्ये सामील होण्यासाठी अर्ज करा.
सर्व प्रकारचे अनोखे अनुभव होस्ट करा

तुमचे शहर आकर्षकपणे दाखवा
लँडमार्क्स, म्युझियम्स किंवा सांस्कृतिक आकर्षणकेंद्रांच्या अनोख्या सैरींचे नेतृत्व करा.

काहीतरी चटपटीत असे शेअर करा
कुकिंग क्लासेस, खाण्यापिण्याशी संबंधित सैर किंवा डायनिंगचे अनुभव होस्ट करा.

आऊटडोअर ॲडव्हेंचरचे नेतृत्व करा
नेचर हाईक्स, वॉटर स्पोर्ट्स किंवा वन्यजीव मोहिमा गाईड करा.

विविध कलांचा आस्वाद घ्या
गॅलरीज, शॉपिंग आणि फॅशन एक्सप्लोर करा किंवा आर्ट वर्कशॉप्स आयोजित करा.

फिटनेस आणि सेल्फ-केअर शिकवा
वर्कआऊट्स, वेलनेस क्लासेस किंवा ब्युटीशी संबंधित अनुभव होस्ट करा.
लाखो गेस्ट्स.
प्रवाशांचा सर्वात आवडता ब्रँड.Airbnb तुमचे शहर एक्सप्लोर करू इच्छिणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.






2024 मध्ये आले
39 कोटी गेस्ट्स
2024 मध्ये Airbnb वर खर्च केले गेले
$81 अब्ज
39 कोटी या संख्येत नवीन आणि परत येणाऱ्या गेस्ट्सचा समावेश आहे.
$81 अब्ज USD हे वास्तव्ये आणि अनुभवांच्या एकूण बुकिंग्जचे मूल्य आहे.सुंदर स्वरूपात प्रस्तुत व्हा. तात्काळ बुकिंग मिळवा.
इतरांपेक्षा विशेष दिसणारी लिस्टिंग तयार करा आणि तात्काळ बुकिंग्जने तुमचे कॅलेंडर भरा.
तुमचे प्रश्न, आमची उत्तरे
प्रमुख प्रश्न
माझा अनुभव Airbnb साठी योग्य आहे का? Airbnb अनुभव ही एक अशी मार्केटप्लेस आहे जिथे शहराची सर्वोत्तम माहिती असलेल्या स्थानिकांनी होस्ट केलेले अविस्मरणीय अनुभव उपलब्ध असतात. तुम्ही अनोख्या ट्रिप्स आणि टेस्टिंग्ज, आर्ट आणि आऊटडोअर ॲक्टिव्हिटीज, क्लासेस, वर्कशॉप्स आणि इतर अनेक ॲक्टिव्हिटीज होस्ट करू शकता. Airbnb अनुभवांच्या स्टँडर्ड्सबद्दल अधिक जाणून घ्या. मी अर्ज कसा करू? सुरुवात करणे सोपे आहे. प्रथम, तुमच्याबद्दल आणि तुमच्या अनुभवाबद्दल थोडी माहिती द्या. त्यानंतर तपशील, फोटोज आणि प्रवासाचे कार्यक्रम जोडा, तुमचे भाडे सेट करा आणि आमच्या टीमने तुमच्या लिस्टिंगचा आढावा घेण्यासाठी ती सबमिट करा. आम्ही काही बदल सुचवण्यासाठी, लायसन्सेस अपलोड करण्यास सांगण्यासाठी किंवा विम्याचा पुरावा मागण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधू शकतो. तुमची लिस्टिंग मंजूर झाल्यावर, तुम्ही ती पब्लिश करू शकता आणि रिझर्व्हेशन्स स्वीकारणे सुरू करू शकता. सुरुवात करा. Airbnb चे शुल्क किती असते? लिस्टिंग तयार करणे आणि ती आढाव्यासाठी सबमिट करणे हे विनामूल्य आहे. Airbnb बुक केलेल्या प्रत्येक अनुभवाच्या पेआऊटमधून ऑटोमॅटिक पद्धतीने 20% सेवा शुल्क कापून घेते.
होस्टिंगची मूलभूत माहिती
गेस्ट्सना माझा अनुभव कसा दिसून येईल? Airbnb वर अनुभवांसाठी एक समर्पित टॅब आहे आणि तो गेस्टच्या ट्रिपवर विविध टप्प्यांवर दिसू शकतो––जसे की सर्च रिझल्ट्स आणि प्लॅनिंगच्या शिफारशींपासून ते ईमेल्स आणि नोटिफिकेशन्सपर्यंत, तसेच गेस्ट्स प्रवास करत असताना प्रवासाच्या कार्यक्रमांमध्ये संबंधित सूचना म्हणूनही दिसू शकतो.
मला किती लवकर पेमेंट मिळते? तुम्ही तुमच्या Airbnb प्रोफाईलमध्ये सेट केलेल्या पेआऊट पद्धतीवर आणि तुमच्या बँकिंग संस्थेवर अवलंबून, तुम्हाला सहसा अनुभव होस्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेमेंट मिळेल.अर्ज करण्याची प्रक्रिया
आढावा प्रक्रिया साधारणपणे कशी असते? तुम्ही तुमची लिस्टिंग सबमिट केल्यानंतर, तुम्हाला ईमेलद्वारा कन्फर्मेशन मिळेल आणि पुढील कोणत्याही पायऱ्यांची माहिती दिली जाईल. प्रत्येक अनुभव आमच्या स्टँडर्ड्सची पूर्तता करतो याची खात्री करण्यासाठी आमच्या टीममधील एक वास्तविक व्यक्ती प्रत्येक अनुभवाचा आढावा घेते.
अनुभवांचे मूल्यांकन कसे केले जाते? Airbnb वरील अनुभव गुणवत्तेच्या निकषावर तपासले जातात, ज्यासाठी किती वर्षांचा अनुभव आहे, शिक्षण, सर्टिफिकेशन्स, अवॉर्ड्स, मजबूत पोर्टफोलिओज, क्रिएटिव्ह ऑफरिंग्ज, यापूर्वीच्या गेस्ट्सनी दिलेला पॉझिटिव्ह फीडबॅक अशा गोष्टी विचारात घेतल्या जातात. आढाव्याच्या प्रक्रियेला किती वेळ लागतो? आढाव्याच्या प्रक्रियेला सहसा काही आठवडे लागतात. मात्र, जास्त मागणी असलेल्या भागांमध्ये, याला जास्त वेळ लागू शकतो आणि तुम्हाला वेटलिस्टवर ठेवले जाऊ शकते.लायसन्सिंग आणि विमा
माझ्याकडे बिझनेस लायसन्स असणे आवश्यक आहे का? तुम्ही तयार करत असलेल्या लिस्टिंगचा प्रकार तसेच स्थानिक नियमांवर ते अवलंबून असते. एखादे लायसन्स किंवा इतर डॉक्युमेंटेशन आवश्यक असल्यास, आम्ही तुमच्या लिस्टिंगचा आढावा घेतल्यावर तुम्हाला तसे सूचित करू आणि तुम्हाला कोणतेही अतिरिक्त डॉक्युमेंट्स सबमिट करण्यास सांगू. Airbnb वरील लायसन्सिंगच्या आवश्यकतांबद्दल अधिक जाणून घ्या. माझ्याकडे स्वतःचा विमा असणे आवश्यक आहे का? होय, तुम्ही तुमच्या बिझनेसला अनुरूप असा दायित्व विमा राखणे Airbnb ला आवश्यक असते आणि आम्ही या विम्याचा पुरावा पाहण्यासाठी मागू शकतो. Airbnb विमा पुरवते का? याव्यतिरिक्त, Airbnb दायित्व विमा राखते, जो एखाद्या Airbnb अनुभवादरम्यान गेस्टना किंवा इतरांना झालेल्या दुखापतीसाठी किंवा त्यांच्या सामानाला झालेल्या नुकसानासाठी किंवा झालेल्या चोरीसाठी तुम्हाला कायदेशीररीत्या जबाबदार धरले जाण्याच्या दुर्मिळ घटनेत अनुभव होस्ट्सना $10 लाख USD पर्यंतचे कव्हरेज प्रदान करतो. अनुभव होस्ट्सच्या दायित्व विम्याबद्दल अधिक जाणून घ्या.