Airbnb 2022
समर रिलीज

प्रवासाच्या नवीन दुनियेसाठी नवीन Airbnb

लिस्टिंगच्या सुंदर फोटोंच्या दोन ओळींमध्ये Airbnb वर असलेली किल्लेवजा, वाळवंटातील, डिझाईनर, बीचवरील, आणि ग्रामीण कॅटेगरीमधील घरे दिसत आहेत. यातील एक लिस्टिंग मोबाईल फोन स्क्रीनवर दाखवण्यात आली आहे, ज्यामुळे Airbnb ॲपमध्ये लिस्टिंग कशी दिसेल हे दिसून येते.

कुठे आणि केव्हा प्रवास करायचा याबाबतीत लोक आता पूर्वीपेक्षा जास्त फ्लेक्झिबल आहेत. त्यांना या नवीन शक्यतांचा लाभ घेण्यास मदत करण्यासाठी, आम्ही या दशकातील सर्वात मोठे परिवर्तन सादर करत आहोत— ज्यामध्ये शोध घेण्याचा पूर्णपणे नवीन मार्ग, दीर्घकालीन वास्तव्याचा एक चांगला मार्ग आणि अतुलनीय संरक्षणाचा समावेश आहे.

सर्च करण्याचा नवीन मार्ग

आम्ही Airbnb कॅटेगरीजच्या अनुषंगाने निर्माण केलेले नवीन डिझाइन सादर करत आहोत, ज्यामुळे आमच्या गेस्ट्सना Airbnb चे जग सहजपणे शोधण्यात आणि ज्या जागा शोधणे त्यांना माहीत नव्हते अशा जागा शोधण्यात मदत होईल.

एक उघडा लॅपटॉप आणि एक मोबाइल फोन नवीन Airbnb होमपेज प्रदर्शित करतात ज्यावर Airbnb च्या डिझायनर कॅटेगरीमधील लिस्टिंग्जचे फोटो दाखवले जातात. पेजच्या शीर्षस्थानी असलेल्या आयकॉन्सच्या ओळीमध्ये गेस्ट एक्सप्लोर करू शकतील अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज दर्शवलेल्या असतात.

Airbnb कॅटेगरीगेस्ट्सना अप्रतिम घरे शोधण्यात मदत करण्यासाठी डिझाईन केलेले.

आमचे होस्ट्स जगभरात लाखो अनोखी घरे ऑफर करतात. Airbnb कॅटेगरीज त्यांना क्युरेटेड कलेक्शनमध्ये आयोजित करतात, ज्यात 50 हून अधिक कॅटेगरीजची घरे त्यांची शैली, लोकेशन किंवा जवळपासच्या अ‍ॅक्टिव्हिटीजसाठी निवडली जातात. यात समावेश असलेल्या गोष्टी:

सादर आहे डिझाईन कॅटेगरी

वैशिष्ट्यपूर्ण आर्किटेक्चर आणि इंटीरियरसाठी निवडलेली 20,000 हून अधिक घरे गेस्टस आता सहजपणे शोधू शकतात, ज्यामध्ये फ्रँक लॉयड राईट आणि ले कॉर्ब्युझियर सारख्या आर्किटेक्ट्सच्या उत्कृष्ट नमून्यांचा समावेश आहे.

नैसर्गिक वातावरणात असलेले फ्रँक लॉयड राईट यांनी डिझाईन केलेले एक आकर्षक घर ज्याची एक संपूर्ण बाजू जमिनीपासून छतापर्यंत असलेल्या खिडक्यांनी व्यापली आहे.
फ्रँक लॉयड राईट
होस्टचे नाव मारिका
निळ्या आकाशापर्यंत भरारी घेणारी ले कॉर्ब्युझियरनी डिझाईन केलेली एक काँक्रीटची इमारत—तिच्या संरचनेमुळे क्षितिज रेषेवर भौमितिक आकार तयार होतात, आणि त्याचवेळी जमिनीवर एक सूट घातलेल्या माणसाचा निळा पुतळा उभा असलेला दिसतो.
ले कॉर्ब्युसियर
होस्टचे नाव एलोडी
तालमन आर्किटेक्चरने डिझाईन केलेल्या घराचा अंतर्भाग, ज्याचे लाकडी छत, दगडी जमीन आणि आपल्या चिमणीच्या आधाराने सस्पेंड केलेली फायरप्लेस नजरेस पडते.
तालमन वास्तुकला
होस्टचे नाव लिंडा
खुल्या आकाशाच्या खाली उठून दिसणारे नारिंगी धातूपासून बनविलेले कंटेनरसारखे घर, ज्याच्या समोर एक निलगिरीचे झाड दिसत आहे.
रॉबर्ट निकोल अँड सन्स
होस्टचे नाव देगेट
स्टीव्हन होल यांनी डिझाइन केलेल्या पांढऱ्या रंगाच्या आधुनिक घराचा संधिप्रकाशात घेतलेला फोटो ज्यात ते आतून उबदार दिव्यांनी उजळलेले दिसत आहे.
स्टीव्हन होल
होस्टचे नाव सारा
विल्यम टर्नबुल ज्युनिअर यांनी डिझाइन केलेल्या घरातील, कमीतकमी सजावट असलेला पण उबदार दिसणारा लाकडी अंतर्भाग असलेल्या डायनिंग एरियाचे चित्र.
विल्यम टर्नबुल ज्युनिअर
होस्टचे नाव मिजू
कॅमेरून अँडरसन आर्किटेक्ट्सनी बनवलेले घर पौर्णिमेच्या प्रकाशात न्हाऊन निघालेले दिसते. त्याच्या बाहेरील भिंतींच्या धातूच्या पन्हळी परावर्तित करत असलेल्या चंद्रप्रकाशात त्याच्या खिडक्यांमधून आणि मोठ्या खुल्या दरवाजांमधून आतल्या उबदार, लाकडी भागाची झलक दिसत राहते.
कॅमेरून अँडरसन आर्किटेक्ट्स
रिक आणि स्टेफ द्वारे होस्ट केलेले
रिकार्डो बोफिल यांनी डिझाइन केलेली अनोख्या ऑफसेट खिडक्यांची, कँडीसारख्या गुलाबी रंगाची एक उठून दिसणारी एक इमारत चमकदार निळ्या आकाशाशी विरोधाभास साधते
रिकार्डो बोफिल
होस्टचे नाव हॅन्स

आम्ही Airbnb कॅटेगरीज कशा तयार करतो

60 लाख घरांमधून निवड

Airbnb होस्ट्स जगातील सर्वात अनोख्या घरांचे कलेक्शन—220 देशांतील 100,000 हून अधिक शहरांमधील ट्रीहाऊसेसपासून ते छोट्या घरांपर्यंत—देऊ करत आहेत.

मशीन लर्निंगद्वारे विश्लेषण केले

टायटल्स, लेखी वर्णन, गेस्ट रिव्ह्यूज, फोटो कॅप्शन्स आणि इतर डेटाचे विश्लेषण करण्यासाठी मशीन लर्निंग वापरून आम्ही Airbnb वरील लिस्टिंग्जचे विश्लेषण करतो.

Airbnb ने क्युरेट केले

Airbnb क्युरेशन टीमच्या लिस्टिंग्ज रिव्ह्यू करून स्वतः फोटोंची निवड करते. मग प्रत्येक कॅटेगरीचा सुसंगतता आणि फोटोच्या गुणवत्तेसाठी अंतिम रिव्ह्यू केला जातो.

सादर करत आहोत कनेक्टेड बुकिंग

आता पूर्वीपेक्षा जास्त लोक दीर्घकालीन ट्रिप्स घेत आहेत. प्लॅनिंग करताना त्यांना आणखी पर्याय देण्यासाठी, आम्ही कनेक्टेड बुकिंग तयार केली आहेत, हे एक नवीन नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे जे दोन वेगवेगळ्या घरांमध्ये ट्रिप विभाजित करते—आता गेस्ट्स दीर्घकालीन वास्तव्यासाठी लिस्टिंग्ज शोधतील तेव्हा त्यांना सरासरी 40% अधिक लिस्टिंग्ज सापडतील.

जास्त काळ वास्तव्य करण्याचा एक चांगला मार्ग

एका मोबाईल फोनच्या स्क्रीनवर कनेक्टेड बुकिंग दिसत आहे. स्क्रीनवर दिसत आहे: “नोरेब्रो आणि गॅमेलहॉर्म दरम्यान तुमच्या वास्तव्याचा कालावधी विभाजित करा” आणि त्याबरोबरच ट्रिपचे भाडे दाखवले आहे. खाली, घरांचे दोन फोटो दिलेले आहेत. नोरेब्रो इमेज एक मोठी चारकोल बुककेस आणि आधुनिक झुंबर असलेली डायनिंग रूम दाखवते. गॅमेलहॉर्म इमेज आणखी एक डायनिंग रूम दाखवते, जी एका मोठ्या स्कायलाईटने प्रकाशित आहे. प्रत्येक फोटोला तारखांसह कॅप्शन दिले आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते की गेस्ट नोरेब्रोमध्ये 12 दिवस, त्यानंतर गॅमेलहॉर्म येथील घरामध्ये 18 दिवस घालवतील.

एकाच गंतव्यस्थानी दोन घरे

जेव्हा गेस्ट्स एकाच ठिकाणी दीर्घकालीन वास्तव्यासाठी शोध घेतील, तेव्हा आम्ही त्यांना त्या भागातील दोन वेगवेगळ्या घरांमध्ये त्यांची ट्रिप विभाजित करण्याचा पर्याय देऊ.

एका मोबाईल फोनच्या स्क्रीनवर नॅशनल पार्कच्या कॅटेगरीतील कनेक्टेड बुकिंग दिसत आहे. प्रस्तावित ट्रिपच्या किंमतीसह “झिऑन आणि ग्रँड कॅनियन दरम्यान तुमचा वेळ विभाजित करा” असे स्क्रीनवर दिसते. खाली दोन साइड - बाय - साईड फोटो दिलेले आहेत. झिऑनच्या फोटोमध्ये अंधाऱ्या आकाशाखाली एक प्रशस्त चमकदार टेंट दाखवला आहे. ग्रँड कॅनियनच्या फोटोमध्ये डोंगराच्या दृश्यांसह आऊटडोर पूल दिसतो. प्रत्येक फोटोला तारखांसह कॅप्शन दिले आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते की गेस्ट झिऑनमध्ये 4 दिवस, त्यानंतर ग्रँड कॅनियनमध्ये 3 दिवस घालवतील.

एकाच कॅटेगरीमधील दोन घरे

कनेक्टेड बुकिंग 14 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये देखील ऑफर केली जातात, ज्यात कॅम्पिंग, नॅशनल पार्क, सर्फिंग आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे, जेणेकरून गेस्ट्स दोन ठिकाणी सारख्या घरांचा किंवा अ‍ॅक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकतील. उदाहरणार्थ, नॅशनल पार्क कॅटेगरी ब्राउझ करणार्‍या गेस्टसना असे कनेक्टेड बुकिंग सापडेल जे एक घर झिऑनजवळ तर दुसरे ग्रँड कॅनियनजवळ सुचवेल.

एक सुरळीत अनुभव

एका मोबाईल फोनच्या स्क्रीनवर कनेक्टेड बुकिंग दिसत आहे. स्क्रीनवर “रोमा नॉर्टे आणि ला कॉन्डेसामध्ये रहा,” असे शब्द, ट्रिपची किंमत आणि मेक्सिको सिटीमधील दोन चमकदार, रंगीबेरंगी—परंतु भिन्न—पॅटीओ जागांच्या इमेज  दिसतात. खाली “नकाशा” असे लेबल असलेले एक बटण आहे.

इंटेलिजेंट जुळणी

आम्ही लोकेशन, प्रॉपर्टीचा प्रकार आणि सुविधांनुसार जुळणारी दोन घरे हुशारीने पेअर करतो.

एका मोबाईल फोनच्या स्क्रीनवर मेक्सिको सिटीचा नकाशा दिसत आहे. आधीच्या स्क्रीनवर दिसणारी दोन घरे प्रत्येक वास्तव्याच्या तारखा दर्शविणार्‍या काळ्या आयकॉन्सद्वारे दर्शविली गेली आहेत. एक कमानदार काळी रेषा घरे एकमेकांच्या किती जवळ आहेत ते दाखवते. इनसेट इमेज  या कनेक्टेड बुकिंगशी संबंधित दोन रंगीबेरंगी पॅटीओच्या इमेजेसची पुनरावृत्ती करते.

ॲनिमेट केलेले मॅपिंग

कनेक्टेड बुकिंग्ज नकाशावर अ‍ॅनिमेशनद्वारे जोडलेली आहेत जे घरांमधील अंतर आणि वास्तव्याचा क्रम स्पष्टपणे दर्शवितात.

एका मोबाईल फोनच्या स्क्रीनवर रोमा नॉर्टेच्या वास्तव्याच्या जागेची इमेज  तसेच संबंधित बुकिंगची माहिती दिसत आहे. स्क्रीनच्या तळाशी एक बटण आहे जे “रिझर्व्ह” करण्यासाठी गेस्टला आमंत्रित करते.

सुलभ बुकिंग

एकदा गेस्टने कनेक्टेड बुकिंग निवडल्यानंतर, त्यांना एका सहज पद्धतीने प्रत्येक घर बुक करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते—एका वेळी एक घर.